Sunday, October 16, 2011

जीवनदान देणारी 'शाकंभरी' - 'बनशंकरी'

'शाकंभरी देवी'


या देवी सर्व भुतेषु। क्षुद्यारुपेण संस्थिता।
नमः तस्यै नमः तस्यैः। नमः तस्यैः नमो नमः॥

देवी भगवतीच्या 'रणरागिणी स्वरूपातील' आणखी दोन महत्त्वाची रूपे म्हणजे 'शाकंभरी' आणि 'भ्रामरी'. देवीचं 'शाकंभरी' हे रूप अन्नपूर्णास्वरूप आहे. कर्नाटक प्रांतात ही देवी फार
प्रसिद्ध असून, ती अनेकांची कुलदेवता आहे. कर्नाटक प्रांतात विजापूर जिल्ह्यात बदामी शहरापासून सहा मैलाच्या अंतरावर 'चोलचगुडू' या नावाचं एक लहानसं गाव असून, तिथे 'शाकंभरी'
देवीचं स्थान आहे. या भागाला प्राचीनकाळी 'तिलकवन' असं नाव होतं, असा उल्लेख स्कंदपुराण आणि देवी भागवतात येतो. फार प्राचीन काळी एकदा या भागात शंभर वर्षांचा द्वष्काळ पडला

होता. तेव्हा अन्न- पाण्यावाचून सर्व प्राणिमात्र तडफडू लागले. मानवासह सर्व प्राणी भूक- तहानेने व्यावूत्ळ झाले. तेव्हा सर्व जीवमात्राचं पालनपोषण करणार्‍या दयामयी देवी भगवतीला करुणा

आली आणि तिने सर्वांना वाचविण्यासाठी हे एक नवे रूप घेतले. देवीनं आपल्या देहातून शाकभाजी अर्थात फळ, कंदमुळं निर्माण केली. त्याचबरोबर पाताळात जाऊन 'हरिद्रातीर्थाचं' पाणी आणून
लोकांची क्षुद्या तृष्णा भागवली. त्यांचं रक्षण केलं. देवीनं आपल्या देहातून शाकभाजी निर्माण केली म्हणून तेव्हापासून तिचं नाव 'शाकंभरी' असे पडलं. शाकंभरी देवीला 'बदामी- बनशंकरी'
असंही म्हणतात. तिलकवनात देवीनं पाताळातून हरिद्रातीर्थाचं पाणी आणल्यामुळे तिथं द्यान्य, भाजीपाला, झाडंझुडपं, फळांचे वृक्ष बहरले. लोकांना अन्नद्यान्यामुळं जीवदान मिळालं. मात्र, या
क्षेत्राचा असा झालेला उत्कर्ष दैत्यांना पाहवला नाही. त्यांनी तिथे जाऊन अन्नद्यान्याची नासद्यूस करून सर्व लोकांना त्रास धायला सुरुवात केली. तेव्हा देवीने वाघावर स्वार होऊन आपल्या नऊ कोटी
सखींसह दैत्यांवर चाल केली आणि त्यांचा निःपात केला. देवीचा हा पराक्रम पाहून सर्व देवांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी हरिद्रातीर्थ आणि तैलतीर्थ यांच्यामध्ये देवीची सिंहारूढ मूर्ती स्थापन
केली. तीच ही शाकंभरी देवी. ती वनामध्ये निवास करून राहिली म्हणून तिचं नाव 'बनशंकरी' असं झालं. तिलकवनात जेव्हा द्वष्काळ पडला, तेव्हा देवीनं आपल्या शंभर नेत्रातून दयाद्रदृष्टी या
भागावर टाकली आणि उत्तम पाऊस झाला म्हणून तिला 'शताक्षी' असंही म्हणतात, असा उल्लेख श्री शिवपुराणातल्या उमासंहितेत केला आहे. शाकंभरी ही 'द्यन द्यान्य समृद्धीची' देवता आहे.
तिच्याच कृपेमुळे दरवर्षी वेळेवर उत्तम पाऊस होऊन भूमीतून उगवणार्‍या जोमदार द्यान्य पिकांमध्ये मोत्यासारख्या टपोर्‍या दाण्याची कणसं अवतीर्ण होतात पौष महिन्यात शुद्ध पक्षात अष्टमी ते पौर्णिमा
असं या देवीचं नवरात्र करतात.एकदा अरुण नावाच्या महाअत्याचारी असुराने स्वर्गातल्या देवांच्या पत्नीचं शील हरण करण्याचा प्रयत्न चालविला. तेव्हा सर्व देवपत्नी आपल्या शीलाचं रक्षण करण्यासाठी
भ्रमराची रूपं घेऊन देवीभगवतीकडे अभय मागण्यासाठी आल्या. तेव्हा देवीनं 'भ्रामरी'चं रूप घेऊन अरुण दैत्याचा संहार केला. तेव्हापासून तिला 'भ्रामरी' हे नाव प्राप्त झालं.
                                                                
                                                                                                                        दीपा भंडारे
'बनशंकरी देवी'

Banashankari Temple of Karnataka



Banashankari Temple of Karnataka is one of the finest piece of Dravidian style of architecture. Banashankari Temple at Karnataka is situated 5 kilometers away from Badami, the capital city of Chalukyas, at Cholachigud. 
At Banashankari Temple in Karnataka, Goddess Banashankari or Shakambari who is the form of Goddess Parvati is worshiped. The temple is said to be very old and it is believed that the structure of Banashankari Temple in Karnataka was originally built by the Chalukyas of Kalyan but the existing temple was built in 17th century.

The temple is named Banashankari Temple because Ban means forest and it is sited within the Tilakaaranya forest. The Chalukyas worshiped her as their Kuldevi. The Banashankari Temple at Karnataka is mainly worshiped by the weaver community.



The front area of the Banashankari Temple of Karnataka holds a large pond named Harida Tirtha and is surrounded by stone mantapas from three sides. The temple offers a serene environment where you can meditate for sometime and pray to the God peacefully.


The main attraction of the Banashankari Temple of Karnataka is the idol of the Goddess Banashankari which is made up of black stone and is seated as a lion treading down the demon with her foot. The goddess has eight hands and she is seen holding trishul-damaruga, kapaalpatra, ghanta, veda scripts and khadg-kheta.

Pushya-Maas as per the Hindu calendar or January-February as per English calendar is the best time to visit the Banashankari Temple of Karnataka as the car festival is organized there during that period.

Videos of Banashankari devi temple area


Badami caves videos



Maa Shakambari Devi Temple video


Badami Banashankari music album

Badami Banashankari devotional songs.

follow the link below:

http://musicmazaa.com/kannada/devotionalsongs/album/Badami+Banashankari.html

Thursday, October 13, 2011